मुंबई: मशिदींवरील भोंगे हे भक्तीचे प्रतीक नसून लोकांवर लादल्या जाणाऱ्या सक्तीचे प्रतीक असल्याचे मत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा किशोर वाघ यांनी व्यक्त केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मशिदींवरील भोंग्यांबाबत दिलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले असून या आदेशाची अंमलबजावणी १०० टक्के केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने मशिदींवरील भोंग्यांच्या वापराबाबत कठोर निर्णय देत, धार्मिक स्थळांवर होणाऱ्या गैरसोयीच्या आवाजांवर निर्बंध घालण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार, पहिल्यांदा भोंग्याचा नियमभंग झाल्यास संबंधित मशिदीला समज देण्यात येईल; मात्र दुसऱ्यांदा भोंगा वाजवला, तर तो हटवण्यात येईल.
#Watch : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार कायद्याच्या चौकटीत काम करणाऱ्यांना साथ देईल; मात्र देशविघातक कृती करणाऱ्यांना कडक शिक्षा होईल.: चित्रा वाघ, आमदार तथा अध्यक्षा, भाजप प्रदेश महिला मोर्चा#Rohinge #DevendraFadnavis #BJP #Bangladeshi
— rajkaran (@therajkaran) January 24, 2025
@ChitraKWagh pic.twitter.com/DTSE6SRXSe
भाजप सरकारची ठाम भूमिका
आमदार चित्रा किशोर वाघ यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार न्यायालयाच्या या आदेशाची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करेल. त्यांनी असेही सांगितले की, या निर्णयामुळे समाजातील जिहादी वृत्तीच्या समाजकंटकांना चांगलीच अद्दल घडेल.
संविधानाचा आदर करण्याची गरज
आमदार वाघ म्हणाल्या, “भारताच्या संविधानाने सर्व नागरिकांना समान न्यायाचा अधिकार दिला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार वागणे प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. आम्ही कोणत्याही समाजविघातक कृतींना थारा देणार नाही. कायद्याचे पालन करणाऱ्यांचे रक्षण करणे आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे.”
सरकारची पुढील पावले
मशिदींवरील भोंग्यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या आदेशाचा ठोस अंमल करण्यात येईल.
न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत
चित्रा वाघ यांच्या या वक्तव्यामुळे भाजप समर्थक आणि कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. “आम्ही नेहमीच कायद्याचे पालन करत आलो आहोत. त्यामुळे हा निर्णय सर्वांसाठी स्वागतार्ह आहे,” असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले.
या निर्णयामुळे धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या अतिरेकी वापरावर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली असून, भोंग्यांच्या वापराबाबतची नियमावली लवकरच स्पष्ट करण्यात येईल.