X: @therajkaran
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असतानाच भाजपचे उत्तर प्रदेशातील बाराबंकी लोकसभा मतदारसंघाचे (Barabanki Lok Sabha Seat) उमेदवार उपेंद्र सिंह रावत यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. उपेंद्र रावत यांच्याशी संबंधित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
उपेंद्र रावत हे बाराबंकी मतदारसंघाचे खासदार आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजपनं जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत उपेंद्र रावत( Upendra Singh Rawat) यांचं नाव होतं. त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली होती. त्यानंतर आज उपेंद्र रावत यांनी त्यांच्या सोशल मीडियावर निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
उपेंद्र रावत यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा एक एडिटेड व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. जो डीपफेक एआय (Deepfake AI) तंत्रज्ञानाद्वारे बनविला गेला आहे. या प्रकरणी त्यांनी एफआयआर दाखल केली आहे. पक्षाध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी या सगळ्याची चौकशी करावी, अशी विनंती रावत यांनी केली आहे. जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत सार्वजनिक जीवनातील कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असं रावत यांनी म्हटलं आहे.
Also Read: लोकसभा निवडणूक लढण्यापूर्वी सुनील तटकरे जाणून घेणार पदाधिकाऱ्यांची मते