मुंबई
पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. काही वेळापूर्वी त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधलं. हा पक्ष प्रवेश अजितदादांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर संजोग वाघेरे हे अजित पवारांच्या गटात होते. मात्र सध्या लोकसभा जागावरील चाचपणीतून त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजोग वाघेरे मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. गेल्या वेळीही त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांना उमेदवारी मिळाल्याने वाघेरेंना माघार घ्यावी लागली होती. आता महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जागा सुटण्याचे चिन्ह आहे.
कोण आहे संजोग वाघेरे?
संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिल आहे. विशेष म्हणजे ते अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. संजोग हे माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे पुत्र आहेत. ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर तीन वेळा नगरसेवक राहिलेत. त्यांच्या पत्नीही नगरसेविका हत्या. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. संजोग वाघेरे राष्ट्रवादी चे सलग 8 वर्षे शहराध्यक्ष राहिलेत.