Twitter: @NalavadeAnant
मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी संपन्न झालेल्या गणेशोत्सवाची दखल आता सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. यावर शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया पेज वरुन यावर भाष्य करणारे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. या व्यंगचित्रांची जोरदार चर्चा आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सवात इर्शाळवाडी ग्रामस्थ, वारकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, महिला, उद्योजक, विदेशी प्रतिनिधी अशा समाजातील सर्वच स्तरातील प्रतिनिधींचा समावेश होता. गणेश उत्सव हा आनंदाचा सोहळा आहे, तो सर्वांसोबत साजरा करण्यात आला पाहिजे, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उदात्त हेतू मनी ठेवून सर्वस्तरातील मान्यवरांना वर्षा या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करण्यात आले होते.
इर्शाळवाडी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले वर्षावर दाखल होताच तो क्षण वर्षावरील सर्वांसाठी भावुक होता. दहा दिवसांत समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी साकडे घालत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत यासाठी मनोकामना केली.