ताज्या बातम्या मुंबई

ठाण्यात तरुणीला मारहाण; चर्चा करा: अंबादास दानवे

X : @NalavadeAnant

नागपूर

ठाण्यात तरुणीला (Thane incident) गाडीने जाणीवपूर्वक जखमी करण्याची घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी समोर आल्याने पीडित तरुणीवर सर्वच स्तरातून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी मंगळवारी सदर तरुणीला न्याय मिळावा, या मागणीसाठी २८९ अनव्ये चर्चा करण्याची मागणी सभागृहात लावून धरली. 

एमएसआरडीसी (MSRDC) व्यवस्थापकीय संचालकाच्या मुलाने असा प्रकार करणे हे राज्यासाठी कलंकदायी प्रकार आहे. त्यात तरुणीचच चारित्र्यहनन केल जातंय, हे दुर्दैवी बाब आहे. या घटनेत तिघे तरुण दोषी असताना पोलिसांनी त्यांना जामीन मिळेल, अशी कलम लावल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते दानवे यांनी केला.

एखादया स्त्रीवर अन्याय होत असताना सरकार आरोपींना पाठीशी घालतय का ? या प्रकरणात सरकार मूग गिळून गप्प बसणार आहे का ? तसं असेल तर सरकारने मोठया घोषणा करू नये, असे म्हणत आज या घटनेवर चर्चा करण्याची आग्रही मागणीही विरोधी पक्षनेते दानवे यांनी सभागृहात केली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज