मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून वस्तू व सेवा कर लेखा परीक्षा – II, मुंबई यांच्यावतीने वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सात महिलांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात क्रीडा, दुर्बल घटकांसाठी समाजसेवा, उद्योजकता, वैद्यकीय क्षेत्र, मॅरेथॉन, वकिली, संशोधन, तसेच अंध आणि विकलांग शक्तींना शिक्षण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
सन्मानित मान्यवर व्यक्तींमध्ये डॉ. अमिता बी. कर्णिक, डॉ. रत्नप्रभा व्ही पिसाळ, वकील संपदा एस. महाडिक, श्रीमती दीपा पवार, श्रीमती वर्षा एस. जाधव, कु. सुष्मिता एस. गुडुलकर, कु. पूर्णिमा एस. जेधे यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला कार्यालयातील सर्व महिला आणि अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात जीएसटी आयुक्त डॉ. स्मिता डोळस (सोमणे), अतिरिक्त आयुक्त सुरेश मुरुगे, आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोकडे उपस्थित होते.
महिला दिनानिमित्त घेतलेल्या या उपक्रमामुळे महिलांना प्रोत्साहन मिळेल आणि यापुढेही अशाच प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.