मुंबई : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण, पददलितांचे शिक्षण, महिलांसाठी सामाजिक परिवर्तन, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, तसेच वंचित महिलांसाठी कार्य करणाऱ्या राज्यातील ६ महसूल विभागांतील प्रत्येकी एका महिला व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जातो.
सन २०२२-२३ या वर्षासाठी पुरस्कार प्रदान करण्यास शासनस्तरीय निवड समितीने मान्यता दिली आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
या वर्षीच्या पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये –
✅ पुणे विभाग : श्रीमती जनाबाई सिताराम उगले
✅ नाशिक विभाग : डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी
✅ कोकण विभाग : श्रीमती फुलन जोतीराव शिंदे
✅ छत्रपती संभाजीनगर विभाग : श्रीमती मिनाक्षी दयानंद बिराजदार
✅ अमरावती विभाग : श्रीमती वनिता रामचंद्र अंभोरे
✅ नागपूर विभाग : श्रीमती शालिनी आनंद सक्सेना
या मान्यवर महिलांना रु. १ लाख व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.