मुंबई – परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील स्टेडियम प्रवेशद्वारानजीक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव महापालिकेने पारित केला आहे. मात्र, सदर जागेचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याने अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
यासंदर्भात डॉ. राहुल पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुतळा उभारण्याची मागणी जनतेची असल्याचे नमूद केले. २६ ऑगस्ट २०१९ रोजी महापालिकेने यासंदर्भात ठराव संमत केला असला तरी, जागेवरील अतिक्रमणामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडली आहे.
या प्रकरणावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर देताना सांगितले की, पूर्ण पडताळणी करून, आवश्यक जागा वगळून आणि अतिक्रमणे दूर करून हा प्रश्न मार्गी लावता येईल.
नागरिकांमध्ये या विलंबाबद्दल असंतोष असल्याचे काही सदस्यांनी यावेळी व्यक्त केले.