महाराष्ट्र ताज्या बातम्या

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने सामना रंगण्याची शक्यता 

X: @therajkaran

कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून (Hatkangle Loksabha constituency) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एकला चलो रे ची भूमिका अजूनही कायम ठेवली आहे. त्यांच्यासमोर सध्या उमेदवार कोण हे निश्चित नसले तरीही विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) हेच उमेदवार असतील असं सातत्याने सांगण्यात येत आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने सामना रंगण्याची शक्यता दिसून येत आहे.

दुसरीकडे या मतदारसंघात उद्धव ठाकरेंशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना बंडखोरीचा दणका देण्यासाठी शिवसेना ठाकरे गट ही जागा आपल्याकडे ठेवून उमेदवार न देता राजू शेट्टी (Raju Shetti) यांचा विजयाचा मार्ग प्रशस्त करून देतील, अशी चर्चा आहे.

या बदल्यात शेट्टी यांची मदत विधानसभेला घेतली जाऊ शकते. त्यामुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीने ऐनवेळी शेट्टी यांच्याविरोधातील उमेदवार बदलल्यास राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीकडून आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बेरजेच्या राजकारणाचाही भाग आहे. कोरे पन्हाळा शाहूवाडीचे आमदार आहेत. 2019 मध्ये विनय कोरे यांनी भाजपला (BJP) पाठिंबा दिला होता. वारणा खोऱ्यामध्ये त्यांनी वारणा उद्योग समुहाच्या माध्यमातून सहकाराचं जाळं तयार केलं आहे.

राजाराम कारखान्याची परतफेड म्हणून महाडिक गटाकडून त्यांना मदत होऊ शकते. महाडिक गटाची हातकणंगले (Hatkangle) आणि शिरोळ (Shirol) मध्येही कोरे यांची ताकद आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विद्यमान चार आमदार महायुतीमधील असल्यानेही फरक पडू शकतो.

असे असले तरी धैर्यशील माने यांनी विनय कोरे यांची नाराजी ओढवून घेतली आहे. त्यामुळे मतदारसंघातील आडाखा पाहता धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) सध्या अडचणीत असल्याचे दिसते आहे. दरम्यान, विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांच्या विरोधातील अंतर्गत यादवी आणि त्यांना मतदारसंघात होत असलेला विरोध तसेच मतदारसंघातून गायब झाल्याच्या तक्रारीमुळे महायुतीकडून पर्यायी उमेदवार शोधण्यासही सुरुवात झाली असल्याची चर्चा आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात