ताज्या बातम्या महाराष्ट्र

ग्रामीण भागात घरे, कृषीपंपांना वीजदर सवलत, रस्तेविकासाला गती अशा

पायाभूत सुविधा आणि लोकोपयोगी योजनांसाठीच्या पुरवणी मागण्या सादर

मुंबई :- ग्रामीण नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे, मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजनेंतर्गत कृषिपंप ग्राहकांना वीजदर सवलत, केंद्र योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्जासाठी निधी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामांना गती, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना, शासन अंशदान घटकाखाली विविध प्रकल्पांना निधी अशा लोकोपयोगी आणि राज्याच्या पायाभूत विकासाला बळकटी देण्यासाठी निधीची तरतूद असलेल्या 6 हजार 486 कोटी 20 लाख रुपयांच्या आणि निव्वळ भार 4 हजार 245 कोटी 94 लाख रुपये असलेल्या पुरवणी मागण्या आज विधीमंडळात सादर करण्यात आल्या.

आजपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी वर्ष 2024-25 च्या पुरवणी मागण्या आज विधानसभेत सादर केल्या. सादर केलेल्या 6 हजार 486 कोटी 20 लाख रुपयांपैकी 932.54 कोटींच्या मागण्या अनिवार्य, 3,420.41 कोटींच्या मागण्या कार्यक्रमांतर्गत आणि 2,133.25 कोटी रुपयांच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने सादर करण्या आल्या आहेत. 6,486.20 कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा. 4,245.94 कोटी रुपये आहे. सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये महत्वाच्या व मोठ्या पुरवणी मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :-
(रुपये कोटीत)
अ.क्र बाब रक्कम समायोजना नंतरची रक्कम
1 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण) सर्वसाधारण व अ.ज. घटकातील लाभार्थ्यांकरिता पुरवणी मागणी 3752.16 2779.05

2 मुख्यमंत्री बळीराजा वीजदरसवलत योजना- कृषिपंप ग्राहकांना (सर्वसाधारण, अ.जा. व अ.ज. घटक) वीजदर सवलत देण्यासाठी. 2000.00 1688.74

3 केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत रस्ते व पूल प्रकल्पांसाठी देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्जासाठी 1450.00 लाक्षणिक
4 राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान NRLM योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता केंद्र व राज्य हिस्स्यापोटी 637.42 लाक्षणिक
5 मुद्रांक शुल्क अनुदान – महानगरपालिका व नगरपालिका 600.00 600.00
6 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेकरिता 375.00 257.03
7 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र हिस्सा 335.57 लाक्षणिक
8 ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवरील पथदिव्यांच्या विद्युत देयकांची रक्कम, विद्युत देयकांच्या व्याज व दंडाची रक्कम महावितरणला अदा करण्यासाठी 300.00 209.55

9 राज्यातील ४ साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भागभांडवलनिर्मितीसाठी मार्जिन मनी लोन 296.00 296.00
10 पुणे रिंग रोड, जालना नांदेड द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांच्या भूसंपादनाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या परतफेडीसाठी 244.00 लाक्षणिक
11 महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीवेतन व सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी 221.89 लाक्षणिक
12 गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास बळीराजा जलसंजीवनी योजना, शासन अंशदान या घटकाखाली विविध प्रकल्पांसाठी 175.00 लाक्षणिक
13 राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मुळा-मुठा नदी, पुणे- प्रदुषण कमी करण्याचा प्रकल्प 171.00 103.51
14 डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजनेसाठी 150.00 150.00
15 धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान- केंद्र हिस्सा 100.00 लाक्षणिक
16 यंत्रमाग ग्राहकांना वीजदर सवलत देण्यासाठी अतिरिक्त तरतूद करणेबाबत. 100.00 लाक्षणिक

विभागनिहाय प्रस्तावित पुरक मागण्या- मार्च, 2025

अ.क्र. विभाग रक्कम (रुपये कोटीत)

  1. ग्राम विकास विभाग 3006.28
  2. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग 1688.74
  3. नगर विकास विभाग 590.28
  4. उच्च व तंत्र शिक्षण विभाग 412.36
  5. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग 313.93
  6. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग 255.51
  7. महसूल व वन विभाग 67.20
  8. इतर मागास बहुजन कल्याण विभाग 67.12
  9. सार्वजनिक बांधकाम विभाग 45.35
सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात