राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई– केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना ३ टक्के महागाई भत्तात गेल्याच महिन्यात वाढ केल्यानंतर राज्य सरकारने आपल्या १९ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी दिलासादायक बातमी मंगळवारी दिली.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के इतका करण्यात आला आहे. त्यामूळे एकूण १७ लाख कर्मचारी व अधिकाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार १ जुलै २०२४ पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे. याचा थेट परिणाम लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार असून, फेब्रुवारी २०२५ पासून त्यांना वाढीव वेतन मिळू लागणार आहे. निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनाही ही वाढ लागू असेल.
महागाई भत्त्यातील वाढ १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली असली तरी, १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीतील थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०२५ च्या वेतनासोबत ही रोखीने देण्यात येणार आहे.महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने केली जात होती.कर्मचारी संघटनांचे म्हणणे होते की,सरकार ‘लाडकी बहिण’ योजना आणि शेतकरी कल्याणासाठी अनेक निर्णय घेते मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही समान न्याय द्यावा.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या तिजोरीवर ‘लाडकी बहिण योजना’ आणि इतर योजनांमुळे ताण येईल, अशी चर्चा होती.मात्र,सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेऊन आर्थिक धोरण भक्कम असल्याचे स्पष्ट केले आहेच पण या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईशी लढण्यासाठी मदत मिळणार आहे.वाढीव भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण उत्पन्नात सुधारणा होणार असून,याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या आर्थिक स्थितीवर होईल.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून स्वागत
महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या या निर्णयाचे राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेतला, ही बाब समाधानकारक आहे, असे मत संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.या निर्णयामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईच्या झळा कमी जाणवतील आणि त्यांच्या वेतनात थेट वाढ होईल. मात्र प्रश्न असा पडतो की, आता तरी शासकीय कर्मचारी व अधिकारी हे आपल्या कामाप्रती किती एकनिष्ठ राहतात.का अशीच मंत्रालयात येवून आंदोलनाची मालिका सुरूच राहणार हा…..