ताज्या बातम्या राष्ट्रीय

थोड्याच वेळात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार, यंदाच्या बजेटमध्ये काय असेल खास?

नवी दिल्ली

आज १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२४०२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. येत्या काही मिनिटात हा अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आहे. या वर्षी सार्वत्रिक निवडणूक असल्याने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर जुलै महिन्यात संपूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचल्या होत्या. तिथे अर्थसंकल्प मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींनी निर्मला सीतारमण यांचे तोंड गोड केले. संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी संसद भवनात मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या अध्यक्षस्थानी आहेत.

अंतरिम अर्थसंकल्पात मोठे धोरणात्मक बदल करण्याची परवानगी नसते, कारण निवडणुकीचा विचार करता त्याचा मतदारांवर विपरित परिणाम होऊ शकतो. राज्यघटनेकडून सरकार अंतरिम अर्थसंकल्पातील कर प्रणालीत बदल करण्याचा अधिकार आहे.

अंतरिम अर्थसंकल्पात काय असू शकेल खास

  • शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात घोषणा केली जाऊ शकते. किसान सन्मान निधीअंतर्गत मिळणारी रक्कम ६ हजार रुपयांवरुन ८ हजारांवर केली जाऊ शकते.
  • आयकर कलम ८० सी अंतर्गत उपबल्ध कर सवलत २.५ लाखांपर्यंत वाढवू शकते. PF, PPF, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, 5 वर्षांची FD, नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम या आयकर कलम 80C अंतर्गत येतात.
  • आयुष्मान भारत योजनेअंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करून १० लाखांपर्यंत केले जाऊ शकते. सध्या या योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत आहेत.
Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे