X: @therajkaran
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) जळगाव लोकसभा मतदारसंघ (Jalgaon Lok Sabha) जिंकण्याचा दावा करण्यात येतोय. काहीच दिवसांआधी ॲड. ललिता पाटील (Adv Lalita Patil) यांनी त्यांच्या समर्थकांस शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. जळगावमधून लोकसभेसाठी ललिता पाटील या उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.
पहिल्यांदा मिळलेल्या संधीचे शिवसेना ठाकरे गट सोनं करणार आणि जळगाव लोकसभा मतदार संघातून (Jalgaon Lok Sabha) इतिहास घडवणार, असा विश्वास ललिता पाटील यांनी व्यक्त केला आहे. या मतदारसंघातील चाळीसगाव, अमळनेर या तालुक्यांमध्ये ललिता पाटील दौरे करत आहेत. कालच भाजपने (BJP) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. यात जळगाव लोकसभेतून स्मिता वाघ (Smita Wagh) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
अशात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आणि विशेष करून ठाकरे गटाने ललिता पाटील यांना उमेदवारी दिली तर या दोन महिला नेत्यांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवबंधन बांधल्यानंतर ललिता पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “मातोश्रीवर पहिल्यांदाच माझा पक्ष प्रेवश झाला आहे. माझ्या जळगाव जिल्ह्याच्या संपूर्ण टीमसोबत मी पक्ष प्रवेश केलेला आहे. मला सर्वांसोबत काम करायला आवडणार आहे. जळगावला पहिल्यांदा लोकसभेची संधी मिळाली आहे. ज्या दिवसापासून संसद अस्तित्वात आली, त्या दिवसानंतर पहिल्यांदाच ही जागा उद्धव बाळासाहेब गटाला मिळाली आहे. उमेदवार कुणीही असू शकतो. ज्या वेळेला उमेदवार जाहीर करतील, त्यावेळी सर्वांना माहिती होईलच. माझी संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे आणि मला इथे असल्याचा आनंद आहे असे त्यांनी म्हटले होते.