मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२५ या वर्षासाठी गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या एकत्रित उद्घाटन सोहळ्याचे आयोजन बुधवार, १४ मे २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता विधानभवनाच्या चौथ्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले आहे.
या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे मार्गदर्शन करणार असून, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मनोगत होईल.
२३ एप्रिल २०२५ रोजी जाहीर समित्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
विधानसभेतील समित्या व अध्यक्ष:
1. अंदाज समिती – अर्जुन खोतकर (सदस्य २३)
2. लोकलेखा समिती – विजय वडेट्टीवार (२०)
3. सार्वजनिक उपक्रम समिती – अॅड. राहुल कुल (२०)
4. पंचायतराज समिती – संतोष दानवे (२०)
5. रोजगार हमी योजना समिती – सुनील शेळके (२०)
6. उपविधान समिती – प्रतापराव चिखलीकर (१४)
7. अनुसूचित जाती कल्याण समिती – नारायण कुचे (११)
8. विमुक्त जाती व भटक्या जमाती समिती – सुहास कांदे (११)
9. महिला व बालक हक्क समिती – मोनिका राजळे (११)
10. इतर मागासवर्ग कल्याण समिती – किसन कथोरे (११)
11. अल्पसंख्यांक कल्याण समिती – मुरजी पटेल (१२)
12. मराठी भाषा समिती – आशुतोष काळे (१२)
13. विशेष अधिकार समिती – नरेंद्र भोंडेकर (१६)
14. विनंती अर्ज समिती – अण्णा बनसोडे (११)
15. आश्वासन समिती – रवी राणा (१९)
16. नियम समिती – अॅड. राहुल नार्वेकर (११)
17. अनुपस्थिती समिती – डॉ. किरण लहाने (११)
18. अशासकीय विधेयके व ठराव समिती – चंद्रदीप नरके (११)
19. कागदपत्र ठेवणी तदर्थ समिती – अण्णा बनसोडे (१०)
20. वेतन व भत्ते संयुक्त समिती – अजित पवार (११)
21. निवृत्तीवेतन समिती – अजित पवार (११)
22. ग्रंथालय समिती – प्रा. राम शिंदे व अॅड. राहुल नार्वेकर (१५)
23. आमदार निवास व्यवस्था समिती – शिवेंद्रसिंह भोसले (१२)
24. आहार व्यवस्था समिती – डॉ. बालाजी किणीकर (११)
25. खाजगी रुग्णालय तपासणी समिती – अॅड. आशिष जयस्वाल (२१)
26. एड्स चर्चा मंच समिती – (१५ सदस्य)
27. वातावरणीय बदल तदर्थ समिती – प्रा. राम शिंदे व अॅड. राहुल नार्वेकर (१४)
विधान परिषदेतील समित्या व अध्यक्ष:
1. अंदाज समिती – श्रीकांत भारतीय (५)
2. लोकलेखा समिती – कृपाल तुमाने (५)
3. सार्वजनिक उपक्रम समिती – निरंजन डावखरे (४)
4. पंचायतराज समिती – परिणय फुके (५)
5. रोजगार हमी योजना समिती – योगेश टिळेकर (३)
6. उपविधान समिती – उमा खापरे (४)
7. अनुसूचित जाती समिती – अमित गोरखे (४)
8. अनुसूचित जमाती समिती – उमा खापरे (४)
9. विमुक्त जाती व भटक्या जमाती समिती – ज्ञानेश्वर म्हात्रे (४)
10. महिला व बालक समिती – चित्रा वाघ (४)
11. इतर मागासवर्ग समिती – विक्रांत पाटील (४)
12. अल्पसंख्यांक समिती – वसंत खंडेलवाल (४)
13. मराठी भाषा समिती – संजय केनेकर (४)
14. कामगार सल्लागार समिती – प्रा. राम शिंदे (९+६ विशेष निमंत्रक)
15. विशेष हक्क समिती – प्रसाद लाड (११)
16. विनंती अर्ज समिती – डॉ. नीलम गोरे (५)
17. आश्वासन समिती – प्रवीण दरेकर (९)
18. नियम समिती – प्रा. राम शिंदे (१०)
19. शासकीय विभाग समिती – डॉ. नीलम गोरे (७)
20. कागदपत्र ठेवणी समिती – डॉ. नीलम गोरे (८)
21. वेतन व भत्ते समिती – वसंत खंडेलवाल (५)
22. निवृत्तीवेतन समिती – राजहंस सिंह (५)
23. ग्रंथालय समिती – प्रा. राम शिंदे व अॅड. राहुल नार्वेकर (८)
24. निवास व्यवस्था समिती – विक्रांत पाटील (५)
25. व्यवस्था समिती – सदाशिव खोत (४)
26. धर्मादाय रुग्णालय तपासणी तदर्थ समिती – प्रवीण दरेकर (६)
27. एड्स चर्चा मंच समिती – (७ सदस्य)
28. वातावरणीय बदल तदर्थ समिती – प्रा. राम शिंदे व अॅड. राहुल नार्वेकर (४+३ विशेष निमंत्रक)
या सर्व समित्यांचे एकत्रित उद्घाटन १४ मे रोजी विधानभवनात पार पडणार आहे.