छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. या जागेवरुन एकनाथ शिंदे गटाचे संदीपाम भुमसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यादरम्यान संदीपाम भुमसे यांच्या पत्नीच्या संपत्तीवरुन मोठा खुलासा झाला आहे.
सोमवारी २२ एप्रिल रोजी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात भुमरे यांच्या पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम दाखवण्यात आला होता. यानंतर विरोधकांनी टीका केल्यानंतर त्यांनी २२ एप्रिल रोजी आणखी एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं. या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात पत्नीचा व्यवसाय शेती आणि मद्यविक्री परवाने असा दाखवण्यात आला आहे. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भुमरेंनी प्रतिज्ञापत्रात दारू दुकानांची माहिती का लपवली, असा सवाल उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे २०२० मध्ये भुमरेंच्या पत्नीचे उत्पन्न शून्य रुपये होते, ते २०२३ मध्ये १४.८६ लाखांपर्यंत पोहोचलं आहे.
हे ही वाचा-सोलापुरात वंचितची खेळी ; अपक्ष उमेदवाराला दिला पाठींबा ; प्रणिती शिंदेंचे टेन्शन वाढणार!
दुसरीकडे मंत्री झाल्यानंतर गेल्या चार वर्षात संदीपाम भुमरे यांच्या संपत्तीच अडीच पट वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीचा बाजारभाव ५.७० कोटींहून अधिक आहे. भुमरेंकडे २८ लाखांची फॉर्च्युनर कार आहे तर ४५ तोळं सोनं आहे. २०१९ मध्ये भुमरेंची संपत्ती २ कोटी होती. तर २०२४ मध्ये संपत्तीत मोठी वाढ होऊन ५.७० कोटींपर्यंत पोहोचली आहे.