मंबई- लोकसभा निवडणुकांत अस्तित्व पणाला लागलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्र्चारकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पहिल्याच्या टप्प्यायतील उमेदवारांचे अर्ज भरुन झाल्यानंतर आता राज्यात प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. महायुतीसमोर प्रचार करताना ठाकरेंची सेना आणि मविा नेत्यांचा कस लागणार आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात ऐन उन्हाळ्यात प्रवास करुन प्रत्येक पक्षाला प्रचार करावा लागणार आहे. प्रचार करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिलेदारांची यादी प्रसदिध् करण्यात आलेली आहे.
कोण आहेत स्टार प्रचारक?
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह अनेक नेते ठाकरेंच्या सेनेचा प्रचार करणार आहेत. त्यात सुषमा अंधारे, किरण माने, आदेश बांदेकर या प्रमुख चेहऱ्यांचा समावेश आहेत.
स्टार प्रचारकांची नावं
स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अॅड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे. शिवसेना नेत्यांबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंकाजोशी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.
हेही वाचाःकीर्तिकरांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेला उमेदवार मिळेना? गोविंदाला विरोध, कोण असेल उमेदवार?