मुंबई : शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभेसाठी जोरदार कंबर कसली असून याआधी त्यांनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली होती .त्यानंतर आज शिवसेना स्टार प्रचारकांची( star campaigners List of Thackeray group )यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्यात 40 जणांचा समावेश आहे.. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray )यांच्यासह संजय राऊत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांच्यासह 40 जणांची तोफ आता लोकसभेच्या प्रचारावेळी धडाडणार आहे .
ठाकरेंच्या स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार ॲड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे.तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादीत शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदार, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी यांचा समावेश आहे.
दरम्यान दुसरीकडे काळ शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण नऊ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मात्र या पहिल्या यादीत कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी कुणाचेही नाव जाहीर केलेले नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.