नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर इंडिया आघाडीला नवे बळ मिळाले आहे. आता विरोधकांची ही एकजूट रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर ताकदीने पाहायला मिळणार आहे. यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. रॅलीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी आम आदमी पक्षाच्या खांद्यावर आहे, तर काँग्रेस आणि इतर घटक पक्ष रॅली यशस्वी करण्यासाठी मदतीची भूमिका बजावत आहेत.
या नेत्यांचा समावेश..
-काँग्रेसमधून मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी.
- राष्ट्रवादी (पवार गट) अध्यक्ष शरद पवार
- शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट
- समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव
- आरजेडी नेते तेजस्वी यादव
- तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन
- द्रमुक नेते तिरुची एन. शिव
- नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला
- झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन
- हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन
- CPM सरचिटणीस सीताराम येचुरी
- CPI सरचिटणीस डी. राजा
- CPI(ML) नेते दिपंकर भट्टाचार्य
- फॉरवर्ड ब्लॉकचे नेते जी देवराजन
- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान
लेखी परवानगी मिळाली…
‘आप’चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष गोपाल राय म्हणाले, रॅली आयोजित करण्याचे सर्वात मोठे आव्हान त्यासाठी परवानगी मिळवणारे होते. यासाठी पक्षाकडून दिल्ली पोलीस आणि निवडणूक आयोगाला अर्ज देण्यात आला होता. गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या परमिशन सेलकडून रॅली आयोजित करण्यासाठी लेखी परवानगी मिळाली आहे.