मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु झाली तरी अजूनही महायुतीतील मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नाही . रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri -Sindhudurg) , पालघर (Palghar), छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar)जागेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. कारण या जागेबाबत काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उदय सामंत (Uday Samant )आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)यांच्यात वर्षा बंगल्यावर अडीच तास चर्चा झाली. या बैठकीत या तिन्ही लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे . .
छत्रपती संभाजीनगरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठा नेते आणि मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील इच्छुक आहेत. पण भाजप सुद्धा या जागेसाठी दावा केला आहे .त्यामुळे या जागेसाठी भाजपचाच उमेदवार मैदानात उतरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या जागेवर उदय सामंत आपल्या भावासाठी आग्रही आहेत. शिवसेनेला ही जागा सोडल्यास मोठ्या ताकदीने ही जागा निवडून आणू असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला आहे . तर दुसरीकडे विद्यमान खासदार विनायक राऊत(Vinayak Raut )हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाकरेंनी त्यांना पुन्हा एकदा तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे राऊतांच्या विरोधात राणे मैदानात उतरणार, की ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत होणार, याची उत्सुकता आहे . तर पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे या तिन्ही जागेवर कोणाकोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे .
आतापर्यंत भाजपने २४, तर शिवसेनेने आठ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे इथे आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भागवत कराड आणि अतुल सावे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे . त्यामुळे या तिन्ही जागेचा तिढा आता लवकरच सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे . .