मुंबई : लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना अद्याप महाराष्ट्रातून काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांनी आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपने आतापर्यंत २३ तर काँग्रेसने १२ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आलेला नाही. तर भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त इतक पक्ष किती आणि कोणत्या जागांवर निवडणूक लढवणार हा तिढा अद्याप कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत ज्या जागा जिंकल्या त्या पक्षाला त्या त्या जागा मिळतील असं महायुतीचं गणित असल्याचं सांगितलं जात होते. मात्र भाजपने मुंबई उत्तर मध्य या जागेव्यतिरिक्त गेल्या निवडणुकीत जिंकलेल्य सर्व जागांवर उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईतून भाजप विद्यमान खासदार पुनम महाजन यांच्यांऐवजी दुसरा उमेदवार देण्याची शक्यता आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत २३ जागा जिंकल्या होत्या. सध्या भाजपने पूनम महाजन यांच्या जागेव्यतिरिक्त २३ उमेदवार जाहीर केले आहेत.
आतापर्यंत जाहीर झालेले भाजप उमदेवार
१) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
२) रावेर – रक्षा खडसे
३) जालना- रावसाहेब दानवे
४) बीड – पंकजा मुंडे
५) पुणे- मुरलीधर मोहोळ
६) सांगली – संजयकाका पाटील
७) माढा- रणजीत निंबाळकर
८) धुळे – सुभाष भामरे
९) उत्तर मुंबई- पियुष गोयल
१०) उत्तर पूर्व मुंबई- मिहीर कोटेचा
११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर
१२) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१३) लातूर- सुधाकर श्रृंगारे
१४) जळगाव- स्मिता वाघ
१५) दिंडोरी- भारती पवार
१६) भिवंडी- कपिल पाटील
१७) वर्धा – रामदास तडस
१८) नागपूर- नितीन गडकरी
१९) अकोला- अनुप धोत्रे
२०) नंदुरबार- डॉ. हिना गावित
२१) सोलापूर – राम सातपुते
२२) भंडारा गोंदिया – सुनील मेंढे
23) गडचिरोली चिमूर – अशोक नेते
पाच विद्यमान खासदारांची कापली तिकीटं…
भाजपने महाराष्ट्रातून उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. बीडमधून प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे, जळगावात उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ, सोलापूरातील जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याऐवजी रात सातपुते, उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. या पाच विद्यमान खासदारांची तिकीट कापण्यात आली आहेत.