मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडी येत्या दोन दिवसात जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान रामदास आठवले यांनी दोन जागांची अपेक्षा व्यक्त केली आहे.याशिवाय निवडणुकीनंतर पक्षाला मंत्रीपद देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत रामदास आठवले म्हणाले, माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मंत्रिमंडळात मला स्थान देण्यात आलं. आता आम्हाला महाराष्ट्रातून सोलापूर आणि शिर्डी या दोन जागांची अपेक्षा आहे. मात्र एकही जागा मिळाली नाही तरी एनडीएची साथ लगेचच सोडण्याचा विचार करणार नाही, असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीपासून वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न…
यावेळी रामदास आठवले यांनी वंचितला महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा सल्ला दिला आहे. कारण वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे. इच्छूक नसतानाही त्यांना घेण्यासाठी चालढकल केली जात आहे. असं करून ते वंचितचा अपमान करीत आहे. अशावेळी त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊ नये असा सल्ला रामदास आठवले यांनी वंचितला दिला आहे.
मुंबईच्या दौऱ्यावेळी राहुल गांधी चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेतलं, याबाबत रामदास आठवले यांनी राहुल गांधींचे आभार मानले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण करू दिली. त्यावेळी त्यांच्याही मोठ्या सभा होता, मात्र फार मिळेल असं वाट नाही, असंही आठवले यावेळी म्हणाले.
अजित दादांचा विस्तार झाला, मात्र आमचा विकास होऊ शकला नाही, त्यामुळे या निवडणुकीनंतर रिपल्बिकन पक्षाला मंत्रिपद द्यावं. सोलापूर आणि शिर्डी येथे शिंदे गटाचे खासदा आहे. मात्र आम्हाला तिथं संधी दिली तर महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये फायदा होईल. महाराष्ट्रातील सत्तेमध्ये आम्हाला वाटा मिळाला नाही, अशीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.