नागपूर– राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेच्या समारोपाची शिवाजी पार्कात पार पडलेली सभा म्हणजे हास्यजत्रा होती, अशी टीका भाजपानं केलीय. राहुल गांधी यांचं भाषण लोकांना कळलं नाही, अनेक जणं सभा सोडून निघून गेले, ५० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या, अशी टीकाही करण्यात येतेय. राहुल यांचं भाषण म्हणजे हास्यजत्रा होती अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय.
उद्धव ठाकरेंवरही निशाणा
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात जमलेल्या तमाम हिंदू बंधू भगिनींनो अशी होत असते. मात्र कालच्या सभेत त्यांनी हिंदू शब्द टाळला. यावरुन राहुल गांधींना ते शरण गेलेयेत. हेच स्पष्ट होतंय. असंही बावनकुळे म्हणालेत.
उद्धव ठाकरेंना आव्हान
उद्धव ठाकरेंचं हसू येतं, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी यांचा फोटो लावून तुमचे १८ खासदार २०१९ च्या लोकसभेला निवडून आलेत. यावेळी तुम्ही १८ खासदार निवडून दाखवाच असं आव्हानही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. शरद पवार हे देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी कधी हमीभावाचा, पीक विम्याचा विचार केला नाही, असंही बावनकुळे म्हणालेत. बारामतीच्या बाहेर फिरता येत नाही. तुम्ही एका परिवारात, मतदारसंघात अडकले आहात, तुम्ही मोदींशी बरोबरी कशी कराल, असा चिमटाही बावनकुळेंनी काढलाय.