मुंबई
महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपांवर चर्चा सुरू आहे. दरम्यान महायुतीने लोकसभेत महाराष्ट्रात ४५ पार जाणार असल्याचं संकल्प केला आहे. त्यामुळे भाजपने कंबर कसली असून यंदा कोणाकोणाला रिंगणात उतरवणार याबाबत अंदाज बांधला जात आहे.
लोकसभेत ४०० हून जास्त जागांचा नारा भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आला आहे. निवडणूक चुरशीची असल्यानं भाजपातील दिग्गजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे. उ. प्रदेशानंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत. त्यामुळेच राज्यातल्या ४८ पैकी ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प महायुतीच्या वतीनं करण्यात आलेला आहे.
भाजपाचे संभाव्य उमेदवार
१. पियूष गोयल/मिलिंद देवरा- दक्षिण मुंबई
२. राहुल नार्वेकर- दक्षिण मुंबई
३. विनोद तावडे- उत्तर मुंबई
४. रवींद्र चव्हाण- रत्नागिरी-सिंधुदुर्ग किंवा ठाणे
५. विनय सहस्रबुद्धे- ठाणे
६. सुनील देवधर- पुणे
७. मुरलीधर मोहोळ, पुणे
८. नारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग
९. चंद्रशेखर बावनकुळे-वर्धा
१०. सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर
११. हंसराज अहिर- चंद्रपूर
१२. गिरीश महाजन – रावेर
१३. मंगेश चव्हाण- जळगाव
१४. जयकुमार रावल/अमरिश पटेल-धुळे
१५. अमरिश पटेल- धुळे
लोकसभेला ४०० पेक्षा जास्त जागांचा नारा भाजपाच्या पक्षेष्ठींकडून देण्यात आलाय. २०१९ साली भाजपला २३ तर युतीला ४१ जागा मिळाल्या होत्या. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या साथीनं महायुती म्हणून लोकसभेला भाजपा सामोरी जातेय.
गेल्या वेळच्या खासदारांना तिकिटं नाकारत, आमदार, मंत्री, राज्यसभा खासदारांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आलेत. मतदारसंघातींल नेत्यांची ताकद, जातीपातीची समीकरणं पाहून हा निर्णय होईल. भाजपचे नेते मात्र याबाबत केंद्रीय पक्षनेतृत्वाने जे सांगेल ते मान्य असल्याचं सांगतायेत. दुसरीकडे महायुतीत असलेल्या शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या यादीवरही भाजपाची छाप असण्याची शक्यता आहे.
विजयी होण्याच्या निकषावर काही दिग्गजांना तिकिटं दिली जातील. तर काहींना कमळ चिन्हावरही निवडणुकीत उतरवलं जाईल अशी चर्चा आहे….
शिंदेंच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
१. संदीपान भुमरे- छत्रपती संभाजीनगर
२. संजय राठोड- यवतमाळ-वाशिम
३. तानाजी सावंत- धाराशिव
४. उदय सामंत- रत्नागिरी-सिंधुदुर्ग
तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतूनही काही नाव चर्चेत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार
१. सुनेत्रा पवार- बारामती
२. शिवाजीराव आढळराव पाटील- शिरुर
३. सुनील तटकरे – रायगड
४. प्रफुल्ल पटेल- भंडारा
५. राजेश विटेकर – परभणी
६. रामराजे नाईक निंबाळकर- सातारा
७. नितीन काका पाटील- सातारा
८. अर्चना राणा जगजितसिंह पाटील- धाराशिव
९. किरण सामंत- रत्नागिरी सिंधुदुर्ग
शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही याबाबत चर्चा सुरू होईल असं सांगतायत. १४ जानेवारीनंतर महायुतीचे मेळावे राज्यात होणारे. त्यानंतर याबाबत चर्चा सुरु होईल असं कळतंय….
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि मोदी गॅरंटीवर ही निवडणूक लढवत असल्यानं उमेदवारांच्या यादीवर दिल्लीचा वरचष्मा राहील असं सांगण्यात येतंय. भाजप धक्कातंत्राचा वापर करुन वेगळे चेहरे निवडणुकीत उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भल्या भल्या संभाव्य उमेदवारांना भूकंपाचे धक्के बसू शकतील.