मुंबई : गेल्या काही दिवसापासुन रासपचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar)महायुतीत आल्याने बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार की परभणी लोकसभा मतदारसंघातून अशी चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,महादेव जानकर हे बारामतीऐवजी परभणी लोकसभा ( Parbhani Loksabha )मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
दरम्यान संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातुन सुनेत्रा पवार(Sunetra Pawar ) याच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला अशी ओळख बारामती मतदारसंघाची आहे. या मतदारसंघावर पवार कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. आता जानकरांनी बारामतीऐवजी परभणीतून निवडणूक लढवण्याचं निश्चित केल्यानंतर पवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत महायुतीबरोबत जाण्याचा निर्णय घेतला . त्यांना महायुतीकडून एक जागा मिळणार आहे. आता ते घड्याळ चिन्हावर लढणार की कमळ चिन्हावर निवडणूक लढणार याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना महाविकास आघाडीकडून (MVA)राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar )यांनी महादेव जानकर यांना एका जागेची ऑफर देण्यात आली होती. महादेव जानकर यांच्यासाठी आपन म्हाडा लोकसभा मतदारसंघ सोडण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटलं होत. त्यानंतर जानकर यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती तरीदेखील त्यांनी महायुतीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे