मुंबई – केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दिवाळखोरी होऊ नये, यासाठी अटलजींच्या सरकारने फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ॲक्ट आणला होता. महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती घसरली आहे, हे निती आयोगाच्या रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने यावर व्हाईट पेपर काढून उत्तर द्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि महासंसद सदस्य सुप्रिया सुळे यांनी मुंबईत बोलताना म्हटले.
सुळे म्हणाल्या, “निती आयोगाने माझे म्हणणे मान्य केले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी विचारत आहे की राज्यातील आर्थिक स्थिती कशी आहे. महाराष्ट्र का मागे जात आहे याचा विचार होणे आवश्यक आहे.”
त्यांनी सरकारवर टीका करत सांगितले, “दावोसमध्ये महाराष्ट्रातील लोकांशी करार करण्यात अभिमान आहे, पण त्यासाठी दावोसला जाण्याची गरज होती का?”
सुळे यांनी संजय देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबांच्या न्यायासाठी सरकारकडून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. “50 दिवस झाले, तरी एक खुनी फरार आहे. यंत्रणा काय करत आहे?” असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “माझ्यामुळे पक्षाची दररोज हेडलाईन होत असेल, तर मी पक्षाकडून राजीनामा दिला असता. पक्षाला अडचणीत आणण्यासाठी मी इथे आले नाही.”
सुळे यांनी बीड प्रकरणावर कडक टीका करत सांगितले की, “अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि छगन भुजबळ यांना ऐकीव बातम्यांवर अटक झाली होती, तर संतोष देशमुख प्रकरणातही अनेक पुरावे आहेत.”