X: @therajkaran
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिलेला असताना त्यावर महाविकास आघाडी ने अद्याप निर्णय घेतला नाही. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना घेण्यास चालढकल केली जात आहे. त्यांना ताटकळत ठेऊन अद्याप निर्णय घेतला गेला नाही. महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांचा अवमान करीत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत जाण्याचा विचार सोडुन द्यावा. त्यांनी महाविकास आघाडीत जाण्यापेक्षा स्वतंत्र निवडणुका लढाव्यात किंवा एन डी ए मध्ये येण्याचा विचार करावा असा सल्ला आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.
प्रकाश आंबेडकर हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत.त्यांचा स्वतःचा एक पक्ष आहे. त्याचबरोबर ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांना महाविकास आघाडीत घ्यावे असा प्रस्ताव स्वतः प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला आहे. मात्र त्यावर महाविकास आघाडी निर्णय घेण्यात दिरंगाई करून त्यांना ताटकळत ठेवत आहे. हा प्रकार अवमानकारक वागणुकीचा आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत जाऊ नये त्या पेक्षा प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणुका लढाव्यात किंवा एन डी ए मध्ये येण्याचा विचार करावा असा सल्ला ना.रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.
Also Read: महाराष्ट्रात काँग्रेस व मविआ जास्तीत जास्त जागा जिंकेल…?