मुंबई
राज्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरुन संघर्ष सुरू आहे. राज्यात भाजप सरकारला चिथावणी देण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि आता वंचितला सोबत घेऊन लोकसभेची (Loksabha Election 2024) तयारी करण्याचा प्लान आखताना जागावाटपाचा तिढा मात्र कायम आहे. चारही पक्ष आपला आकडा घेऊन मैदानात उतरलेत, मात्र प्रत्यक्षात लोकसभेसाठी महाराष्ट्रातल्या जागा ४८.. अशा परिस्थितीत जागा वाटप कसं होणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे.
२०१९ च्या निवडणुकीचा संदर्भ देऊन २०२४ च्या निवडणुकीत जागा वाटप शक्य नसल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीत आता काँग्रेसने २७ जागांवर दावा केला आहे. तर दुसरीकडे २३ जागांवर शिवसेना ठाकरे गट ठाम आहे. संजय राऊतांनी २३ जागा मिळाल्याचं पाहिली ही भूमिका सतत मांडत आहे. याशिवाय शिवसेनेने जिंकलेल्या १८ जागांवर चर्चात होऊ शकत नाही असंही राऊत यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून १४ जागांची चाचपणी केली जात आहे. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी तर १२+१२+१२+१२ चा दिल्यानंतर अनेकांचं टेन्शन वाढलं.
त्यामुळे चार पक्षांचं गणित केलं तर काँग्रेस २७, शिवसेना ठाकरे गट २३, राष्ट्रवादी शरद पवार गट १४ आणि वंचितचे १२ अशा जागांची बेरीज ७६ आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा ४८…अशावेळेस ‘उमेदवार ७६ आणि जागा फक्त ४८…बहुत ना इन्साफी है’ असंच म्हणायला हवं.