बीड
राज्य मागास आयोगाला मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम दिलं आहे. राज्य सरकारने दिलेल्या सूचनेनुसार राज्य मागास आयोगाकडून बीड जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाची तयारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी ३ हजार ४७९ प्रगणकांची नेमणूक करण्यात आली असून पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे.
यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे या जिल्हा स्तरावर नोडर ऑफिसर असून सहाय्यक नोडल ऑफिसर म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी असतील. तालुका स्तरावर तहसीलदार आणि शहरी भागात नगरपालिका व नगर पंचायतींचे मुख्याधिकारी नोडल ऑफिसर असतील. यासाठी दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना पुणे येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.