मुंबई
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात खरी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचा निकाल दिल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नार्वेकरांविरोधात आंदोलन पुकारले. या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. मात्र राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेली नवी याचिका नाही.
दरम्यान नार्वेकरांच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे. १६ जानेवारी रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याती शक्यता व्यक्त केली जात आहे.
राहुल नार्वेकर यांनी कोणालाह अपात्र न करता शिवसेना हा पक्ष शिंदेंना दिला, त्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका जाहीर करण्यात आली. परंतू अद्याप राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे १६ जानेवारी रोजी होणारी सुनावणी ही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या एकत्रित आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर होईल.