महाराष्ट्र

महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान केलाच पाहिजे – राज ठाकरे

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं त्यांच्यावर त्याच भाषेतील पाट्या असायला हव्यात, इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? अशा खरमरीत शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी न्यायालयाच्या एका निर्णयावर व्यापाऱ्यांना जाब विचारला.

महाराष्ट्रात असाल तर मराठीत आणि इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं यात विरोध करण्यासारखं काय होते ? तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे, असेही राज ठाकरे यांनी दुकानांवरील मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना सुनावले.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील दुकाने, आस्थापना यावर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत, असा निकाल दिला आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक्सवरून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत व्यापाऱ्यांना आपल्या शैलीत सुनावले.

दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा, तरच इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका, अशा भाषेत ठाकरे यांनी बजावले.

‘मराठी पाट्या’ या बाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली. त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसंच पुढे देखील राहिलं पाहिजेत, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचेही कौतुक केले.

‘मराठी पाट्या’ या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला न्यायालयाच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला. आता सर्वोच्च न्यायालयाने पण यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली असल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवीच, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचंही काम आहे, असेही राज ठकरे यांनी एक्समध्ये नमूद केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात