Twitter : @therajkaran
मुंबई
पत्रकारांना धाब्यावर न्या, चहा प्यायला न्या, असा सल्ला देणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टीका करतांना, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधान परिषद सदस्य अनंत गाडगीळ (Congress Leader Anant Gadgil) यांनी आरोप केला की, केन्द्रात भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य बहाल करण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर बंधने लादण्यात येत आहेत.
गाडगीळ यांनी काही घटना निदर्शनास आणून दिल्या. ते म्हणाले, भा ज प ला सातत्याने विरोध करतात म्हणून गेल्या ३-४ वर्षात दिल्लीतील तसेच महाराष्ट्रातील टि व्ही चॅनेलच्या प्रसिध्द संपादकांचे राजिनामा घेण्यात आले. संसद भवनात (Parliament) पत्रकार गॅलरी शिवाय ईतर ठिकाणी आता पत्रकारांना प्रवेश बंद करण्यात आला आहे, संसदेत पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना निवृतीनंतर पूर्वी विशेष पास दिला जायचा तोही बंद करण्यात आला.
गाडगीळ म्हणत, निर्भिडपणा दाखविणाऱ्या चॅनेलची मालकीच बदलण्यात आली, आता तर राज्यातील भा ज प च्या नेत्यांनी आपल्या वक्तव्यातून पत्रकारांची प्रतिमा पार “ धाब्यावर” बसवली आहे. हेच कॉँग्रेसच्या (Congress) राजवटीत झाले असते तर अग्रलेख व रकाने यांनी पेपर भरून गेले असते. एवढे सारे होउनही पत्रकार गप्प का ? किती पत्रकारांनी याविरूद्ध आवाज उठविला असे प्रश्न आज कॉँग्रेस प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केले आहेत