ताज्या बातम्या महाराष्ट्र

MNS : मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र

X: @therajkaran

मुंबई: पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रॅंड नेते, प्रदेश सरचिटणीस वसंत तात्या मोरे (Vasant More MNS) यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या फोटो पुढे साक्षात दंडवत घालत मोरे यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे.

याबाबत त्यांनी एक पत्र आणि फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत त्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुका (Loksabha Election) येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून या काळात त्यांनी राजीनामा दिल्याने राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

पक्षाच्या स्थापनेपासून सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली १८ वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत, यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो, त्या सहकाऱ्याची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून कोंडी करण्याचे तत्व अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती. अशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

वसंत मोरे हे पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून रंगली होती. त्यातच त्यांनी अनेकदा खदखददेखील व्यक्त केली होती. त्यांनी आज सकाळीच ‘एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो’, अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यानंतर काही तासातच त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ते शरद पवार यांना भेटले होते. त्यामुळे आता ते शरद पवार (Sharad Pawar) यांना साथ देतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात