मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) सोलापूर मतदारसंघातुन जोमाने तयारीला लागल्या आहेत . यावेळी त्यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे . त्या म्हणाल्या , नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार चार सौ पार’, असा नारा दिला आहे. मात्र इंडिया आघाडी मुळे नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत.’चार सौ पार’ होणार नसून तडीपार होणार आहे. त्यामुळेच केजरीवालांना रातोरात अटक करण्यात आली. काँग्रेसचे बँक खाते गोठवण्यात आली, हे सर्व भीती मुळे करत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे .
या सोलापूर मतदारसंघात काँग्रेसने (Congress) सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेना उमेदवारी घोषित केलीय. तर दुसरीकडे भाजपने (BJP) देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आमदार विरुद्ध आमदार अशी ही निवडणूक होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष सोलापूरकडे लागले आहे. उमेदवारी घोषित होताच राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात सोशल मीडियावर युद्ध रंगायला सुरुवात झाली आहे. मात्र प्रत्यक्षात कोणाची ताकद किती हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 1952 साली तयार झालेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काही वर्षांचा अपवाद वगळला तर काँग्रेसचा गड राहिला आहे. 2014 च्या मोदी लाटेत देशभरात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. सोलापुरात देखील तेच घडले होते. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीला गमावलेला हा गड परत मिळवायचा आहे. तर, दुसरीकडे भाजप हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे. अनुसुचीत जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात नेमके काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोघे एकमेकांवर टीका आहेत.सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे प्रत्येक बैठकीत एकमेकांवर टीका करत आहेत . आज सकाळी अक्कलकोट येथे काँग्रेसच्या झालेल्या सर्वच बैठकीत आणि भाषणात एक शब्द देखील प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांच्या विरोधात काढले नाही. विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करून प्रणिती शिंदे यांनी भाषण करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकेची झोड उठवली .