X: @therajkaran
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त धाराशिव येथे बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. 2002 साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोदींना (PM Narendra Modi) वाचवलं. बाळासाहेब ठाकरे नसते तर आज मोदी कुठे असते? असा सवाल करत त्यांच्यामुळेच मोदींच अस्तित्व असल्याचे सांगत शिवसेना फोडणाऱ्यांना शिवसैनिक मातीत गाडल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
शिवसेनाप्रमुख होते म्हणून मोदी तुम्हाला दिसत आहेत. आम्हाला काय सांगताय मोदींचं कौतुक. ज्यावेळी मोदी नाव कुणाला माहिती नव्हते, तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. आम्हाला आमचे कट्टर शिवसैनिक आणि जीवाला जीव देणारे कट्ट्रर मावळे पुरेसे आहेत. पण, अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या पेटीत टाकायला निघाले होते, तेव्हा हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख यांनी मोदींना वाचवलं नसतं तर, मोदीच दिसले नसते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार घणाघात केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections 2024) प्रसिद्धी मिळवण्यासाठी जनतेच्या पैशातून वारेमाप खर्च जाहिरातीवर केला जातोय. भ्रष्टाचार तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा, असं मोदींचं चाललं आहे. अमित शाह (Amit Shah) यांचा नवा शोध महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) पंक्चर झालेली रिक्षा आहे, पण यांच्या ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे.