मुंबई — मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI) परीक्षेतील प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आक्रमक झाली असून, संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ABVP, मुंबई महानगराच्या वतीने बांद्रा येथील आर. डी. नॅशनल कॉलेजमध्ये 15 एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत, जबाबदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

TY B.Com (Sem VI) मधील तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर आल्याचा प्रकार समोर आल्याने परीक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एबीव्हीपीच्या मते, हा प्रकार केवळ अनियमितता नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा गंभीर प्रकार आहे.
प्रकरण उघडकीस आल्यानंतरही अद्याप ठोस गुन्हा नोंद, पारदर्शक चौकशी अहवाल किंवा जबाबदारी निश्चिती न झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे. काही विद्यार्थ्यांवर कारवाई करून मूळ जबाबदार यंत्रणा वाचवली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
एबीव्हीपी च्या प्रमुख मागण्या

संबंधित सर्व जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत
परीक्षा केंद्रातील Chief Conductor, IT Coordinator यांचे निलंबन
संबंधित विषयांच्या परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा जाहीर करावी
स्वतंत्र आणि पारदर्शक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी
एबीव्हीपीचे मुंबई महानगर मंत्री Prashant Mali यांनी सांगितले की, या प्रकरणात सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असली तरी, विद्यापीठ प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप आहे. “प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत असून, परीक्षा नियंत्रक उत्तर देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

विद्यापीठ प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई केली नाही, तर एबीव्हीपीकडून व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
The RajkaranNOTE
प्रश्नपत्रिका लीक हा फक्त शैक्षणिक मुद्दा नाही, तो विश्वास, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे

