ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रदेश काँग्रेस कार्यालयातील प्रशासन व संघटन विभागाची जबाबदारी नाना गावंडे व प्रमोद मोरेंकडे

मुंबई

काँग्रेसचे पक्षाचे नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे तसेच प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयातील प्रशासन व संघटन विभागाच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या दोघांवर ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

नाना गावंडे यांचे राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात चांगला जनसंपर्क आहे. काँग्रेस पक्षाचा विचार विदर्भातील घराघरात पोहचवण्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी काँग्रेस विचारधारेच्या मार्गाने वाटचाल केली आहे. युवक काँग्रेस, एनएसयुआय या काँग्रेसच्या संघटनांमध्ये त्यांनी काम करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ते प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी असून त्यांचा संघटन व प्रशासकीय कामकाजाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्याकडे प्रदेश काँग्रेस कार्यालयातील दैनंदिन कामकाजाबरोबरच पक्ष संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रमोद मोरे हे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस असून संघटन व प्रशासनाची मागील दोन वर्षांपासून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. प्रमोद मोरे हे काँग्रेसचे विचाराचे पाईक असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी याआधी काम पाहिले आहे. ओबीसी समाजाला काँग्रेसच्या प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी प्रमोद मोरे यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यभर काँग्रेसचा प्रचार व प्रसार केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नाना गावंडे व प्रमोद मोरे यांच्याकडे प्रदेश कार्यालयातील सामान्य प्रशासन विभाग आणि पक्ष संघटन या विभागाचा संपूर्ण प्रभार सोपवण्यात आला आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात