ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी काँग्रेसचा विरोध? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेत जोरदार हल्लाबोल

नवी दिल्ली

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसह पंडीत जवाहरलाल नेहरूंवर आगपाखड केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एकदा नेहरूजींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यावर लिहिलं होतं, मला कोणतेही आरक्षण आवडत नाही. विशेषतः नोकऱ्यांमध्ये आरक्षण. अकार्यक्षमतेला चालना देणाऱ्या अशा कोणत्याही पावलाच्या मी विरोधात आहे, ज्यामुळे दुय्यम दर्जाच्या मानकांना चालना मिळते. पंडित नेहरूंनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.

मोदी पुढे म्हणाले, काँग्रेसने ओबीसींना पूर्ण आरक्षण दिले नाही, सर्वसामान्य गरीब वर्गाला आरक्षण दिले नाही, ज्या काँग्रेसने आंबेडकरांना भारतरत्नासाठी योग्य मानले नाही. ते आम्हाला उपदेश करत आहेत.

काँग्रेसने 7 दशके जम्मू-काश्मीरमधील एससी-एसटी, ओबीसींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले. कलम 370, आम्ही किती जिंकू याबद्दल मी बोलत नाही. कलम 370 रद्द झाल्यावर एससी-एसटी-ओबीसींना ते अधिकार मिळाले, जे देशातील जनतेला वर्षानुवर्षे मिळत होते.

बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी दिला होता?
1989 मध्ये सत्तापरिवर्तन झालं आणि व्हि पी सिंहांचं सरकार स्थापन झालं. यानंतर 1990 मध्ये बाबासाहेबांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला होता.

काँग्रेसने केला होता बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव?
भारताच्या स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनी 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 अशी जवळपास चार महिने लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू होती. या पहिल्या निवडणुकीत लोकसभेच्या 489 जागांसाठी 50 हून अधिक पक्षांचे दीड हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात होते. देशाच्या या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून, म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून, निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई. आणि हा द्विसदस्यीय मतदारसंघच होता. 27 सप्टेंबर 1951 ला आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. स्वातंत्र्य चळवळीमुळे काँग्रेसचं देशभरात वारं होतं, अशावेळी त्यांच्यासमोर टिकून राहण्यासाठी आंबेडकरांनी समाजवाद्यांच्या सोशालिस्ट पार्टीसोबत युती करण्याचं ठरवलं.

उत्तर मुंबई या द्विसदस्यीय मतदारसंघातून सर्वसाधारण जागेवर सोशालिस्ट पार्टीकडून समाजवादी नेते अशोक मेहता यांना तिकीट दिलं गेलं, तर याच मतदारसंघातून राखीव जागेवर स्वत: आंबेडकर उभे राहिले. यावेळी विरोधात काँग्रेस, कम्युनिस्टांसह एकूण 8 उमेदवार होते, अशी माहिती आहे. निकालानंतर अनेकांना धक्का बसला. नारायणराव काजरोळकरांना 1 लाख 38 हजार 137 मतं, तर बाबासाहेब आंबेडकरांना 1 लाख 23 हजार 576 मतं मिळली आणि 14 हजार 561 मतांनी बाबासाहेबांचा पराभव झाला होता. बाबासाहेबांना काँग्रेसनं ठरवून पराभूत केलं, हा आरोप आजतागायत करण्यात येतो.

नेमकं काय घडलं?
स. का. पाटील हे मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. आंबेडकर राखीव जागेवरून उभे राहिल्यास त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार देणार नाही, असं पाटलांनी निवडणुकीआधीच जाहीर केलं होतं. पण शेकाफे आणि समाजवादी पक्ष यांचा करार होताच आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे नारायणराव काजरोळकर यांचे नाव जाहीर करण्यात आले. पाटलांना आंबेडकरांबद्दल आदर होता, मात्र समाजवाद्यांबद्दल तशी भावना नव्हती.

भारताची राज्यघटना लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिल्याच निवडणुकीत पराभव झाल्यानं अनेकांना दु:ख झालं. विजयानंतर काजरोळकर आंबेडकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले, तेव्हा आंबेडकरांनी आशीर्वाद देताना म्हटलं, कुठलीही मदत लागल्यास माझ्या घराची दारं तुमच्यासाठी उघडी असतील.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात