X : @therajkaran
नागपूर
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 18 रुग्णांच्या मृत्यू संबंधातील (Death in Kalwa hospital) अहवाल प्राप्त झाला आहे. घटना घडली तेव्हा सहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक त्याठिकाणी हजर असायला हवे होते; ते तिथे नव्हते. अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना आदेश आजच्या आजच देण्यात येतील, असे उत्तर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तर तासात दिले.
ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation – TMC) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे 18 रुग्ण मृत्यू संबंधातील प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला होता. मंत्री सामंत उत्तरात म्हणाले, “त्या दिवशी झालेल्या 18 मृत्यूपैंकी 9 रुग्ण अचानक खासगी रुग्णालयांतून आयत्यावेळी दाखल झाले होते. त्यांची गंभीर स्थिती होती. त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी औषधे, ऑक्सिजन, खाटा उपलब्ध होत्या. औषधांअभावी किंवा सेवेअभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही.”
मंत्री म्हणाले, त्या रुग्णालयांमध्ये 48 पदांची भरती केली होती. यानंतर 145 पदांची भरती ही तात्पुरती आणि कायमस्वरुपी अशा स्वरुपात केली आहे.