’चित्रांगण’ सभागृहाचे उद्घाटन; नाशिक चित्रनगरीची घोषणा
मुंबई : चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख लेखक, कलाकार, निर्माते व रसिकांसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली. दादासाहेब फाळके चित्रनगरीतील ‘चित्रांगण’ बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
चित्रपट क्षेत्रातील विविध कार्यशाळा
या वर्षी उदयोन्मुख लेखकांसाठी लेखन कार्यशाळा, ग्रामीण व शहरी भागातील होतकरू तरुणांसाठी अभिनय कार्यशाळा, तसेच चित्रपट निर्मिती, वितरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची जाण निर्माण करण्यासाठी निर्मात्यांसाठी कार्यशाळा आयोजित होणार आहेत. त्याचप्रमाणे रसिकांसाठी चित्रपट आस्वादन कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येईल.
नाशिकमध्ये नवीन चित्रनगरी
महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून नाशिकमधील मौजे मुंडेगाव, ता. इगतपुरी येथे नवीन चित्रनगरी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी चित्रपट महोत्सव – एप्रिल २०२५
आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव २१ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान पु. ल. कला अकादमी येथे होणार असल्याची घोषणाही शेलार यांनी केली.
यावेळी चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.