महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोरोनातील कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल, अजित पवारांना थेट चॅलेंज; शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या लंकेंचा राजकीय प्रवास

अहमदनगर : कोरोना काळातील कामामुळे चर्चेत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करीत आहेत. अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निलेश लंके यांच्यानंतर आणखी तब्बल 20 जणं शरद पवार गटात सामील होणार असल्याची माहिती आहे.

कोण आहेत निलेश लंके?
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात उभारलेलं एक हजार बेड्सचं कोरोना केंद्र महाराष्ट्रातच नाही तर देशभरात चर्चेचा विषय ठरलं होतं. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर लंके यांच्या कामाची दखल घेण्यात आली होती आणि यासाठी त्यांना प्रतिष्ठेचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉड्समध्येही समावेश झालेले लंके हे एकमेव आमदार आहेत.

कोरोना काळात बहुमूल्य काम..
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी, पारनेर येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर नावाचे कोविड केअर सेंटर सुरू केले होते. या माध्यमातून त्यांनी दहा हजारांहून अधिक रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा दिली होती. यानिमित्ताने त्यांना मुंबई येथे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉड्स लंडन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

लंकेंचा राजकीय प्रवास
पारनेर हा दुष्काळी व पठारी तालुक्याचा भाग म्हणून ओळखला जातो. येथील हंगा या गावात लंके यांचा जन्म झाला. त्यांना लहानपणापासून कुस्तीची आवड होती. महाविद्यालयात असताना त्यांनी हंगा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीला स्वत:चा पॅनल उभा करून ११ जागांवर विजय मिळवून दिला होता.

बालपणापासून त्यांना समाजकार्याची आवड होती, त्यामुळे कायनेटीक कंपनीत नोकरी करीत असताना त्यांचं मन रमलं नाही. त्यामुळे नोकरी सोडून ते पुन्हा समाजकार्याच्या ओढ्याने गावातील राजकारणात सक्रिय झाले. मात्र कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांनी हंगा गावच्या एसटी बस स्टँडवर एक छोटे चहाचे हॉटेल सुरू केले. मात्र हे दुकानही फारसे चालले नसल्याने बंद करावे लागले.

शेवटी बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वादान त्यांनी शिवसेनेचे तालुका प्रमुख पद मिळाले. २००७ मध्ये त्यांनी पहिली पंचायत समितीची निवडणूक लढवली, मात्र यात त्यांना यश आलं नाही. मात्र यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना करून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आणि अनेक शासकीय योजना आपल्या गावात आणल्या.

मात्र यानंतर त्यांच्या आयुष्यात धक्कादायक घटना घडली. २८ फेब्रुवारी २०१८ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या पारनेर दौऱ्यात झालेल्या पूर्वनियोजित दगडफेकीचे खापर निलेश लंके यांच्यावर फोडण्यात आले, त्यामुळे ६ मार्च २०१८ रोजी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. मात्र प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचं काम सुरूच होतं. त्यानंतर ३० जानेवारी २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले निलेश लंके यांनी थेट अजित पवारांनाच चॅलेंज दिलं होतं. राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार असं आव्हान लंकेंनी थेट अजित पवारांना दिलं होतं. मात्र शेवटी निलेश लंकेना परनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं आणि २४ ऑक्टोबर २०१९ मध्ये ६१ हजार मताधिक्क्याने निवडून येत ते आमदार झाले. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गटात असलेले निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करीत आहेत.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात