नागपूर
सरकारच्या विविध संस्थांमार्फत पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सारथी या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. यंदा सारथीमधून पीएचडीच्या विद्यार्थ्यांची संख्या २०० वर करण्यात आली आहे.
जाहिरात दिल्याच्या सहा महिन्यांनंतर हा बदल करण्यात आला असून आधीच तब्बल १३०० विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केल्याचे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. त्यामुळे नवा बदल पुढील वर्षापासून लागू करावा आणि यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली होती.
दरम्यान याला उत्तर देताना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पीएचडी करून काय दिवे लावणार, (Phd Students protest on Ajit Pawars statement) असं वक्तव्य यावेळी अजित पवार यांनी केले. राज्यात होत असलेल्या पीएचडीपैकी किती पीएचडीची आपल्याला गरज आहे? संख्या वाढवून काय करणार? असं धक्कादायक विधान
विद्यार्थ्यांचा संताप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभागृहात केल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केला जात आहे. तर विद्यार्थ्यांकडून या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. हे वक्तव्य बेजबाबदार असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. संशोधनाची देशभरात दखल घेतली जाते. आणि या वक्तव्यावरुन माफी मागायला हवी. अजित पवारांनी संशोधन काय असतं हे जाणून घ्या आणि त्यानंतर ‘दिवे’ अशा प्रकारच्या शब्दाचा वापर करा.