राष्ट्रीय ताज्या बातम्या

Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड्वरून राजकारण तापलं : सुप्रीम कोर्टाने SBI ला पुन्हा फटकारलं 

X: @therajkaran

देशात इलेक्टोरल बाँड्वरून (Electoral bonds) राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यावर एसबीआय बँकेने (SBI) इलेक्टोरल बाँड्बद्दल माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. मात्र, एसबीआयने अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावरून सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आक्रमक भूमिका घेत कोणतीही माहिती लपवू नका, असे म्हणत पुन्हा एकदा एसबीआयला फटकारले आहे. 

इलेक्टोरल बाँड प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjaya Yeshwant Chandrachud) यांनी एसबीआयला कोणतीही माहिती लपवता येणार नाही, असे म्हणत फटकारले आहे. इलेक्टोरल बाँडशी संबंधित प्रत्येक माहिती सार्वजनिक करावी लागेल, असे आदेश त्यांनी पुन्हा एकदा दिले आहेत. याआधी सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला इलेक्टोरल बाँड्सची माहिती जाहीर करण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ दिला होता. कोर्टाने विचारले होते की, जेव्हा इलेक्टोरल बाँड्सची यादी दिली होती, तेव्हा त्यात युनिक नंबर का नमूद करण्यात आले नव्हते? सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश यांनी SBI ला जाब विचारत, आतापर्यंत संपूर्ण माहिती का दिली गेली नाही? याचे उत्तर मागितले आहे. 

एसबीआय बँकेला फटकारत सुप्रीम कोर्टाने सांगितले की एसबीआयला २१ मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागणार आहे. यात त्यांना इलेक्टोरल बाँड्ची सर्व माहिती देण्यात आली असून कोणतीही माहिती लपवण्यात आलेली नाही असे सांगावे लागेल. याशिवाय इलेक्टोरल बाँड्स क्रमांक तात्काळ निवडणूक आयोगाला द्यावेत जेणेकरून आयोगाला ते वेबसाईटवर अपलोड करता येतील. एसबीआयला प्रत्येक माहिती सर्वोच्च न्यायालयाला द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आमच्या आदेशावर अवलंबून राहणे योग्य नाही, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे