ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रातील आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा : नाना पटोले

X : @NalawadeAnant

मुंबई – राज्यातील आरक्षणाच्या (reservation) प्रश्नाचा पेच भाजपनेच निर्माण केल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state chief Nana Patole) यांनी मंगळवारी केली. २०१४ साली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही फडणवीस यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करत, सत्तेत आलो तर २४ तासात आरक्षणांचा प्रश्न सोडवतो अशी वल्गनाही केली होती. पण १० वर्ष केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, याकडेही पटोले यांनी लक्ष वेधले.

पटोले म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाने राज्यातील जाती जातीत भांडणे लावण्याचे पाप केले आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपाने मराठा (Maratha community) व ओबीसी समाजाची (OBC community) दिशाभूल करुन सामाजिक एकोप्याला बाधा पोहचवली आहे. आरक्षणावर सत्तेत बसलेल्या लोकांना निर्णय घ्यायचा असताना ते विरोधी पक्षांनाच विचारत आहेत. मात्र काँग्रेस पक्षाची आरक्षणावर भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना (Caste wise census) करणे व आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे असे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जाहिरपणे सांगितले आहे, हे काम केंद्र सरकारचे असल्याने केंद्रातील भाजपा सरकारने त्यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. राज्यात व केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास आरक्षणाचा प्रश्न सोडवू, असेही त्यांनी यावेळी ठामपणे स्पष्ट केले.

लाडकी बहिण योजनेवर (Ladaki Bahin Yojana) बोलताना पटोले म्हणाले की, मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) भाजपाने लाडली बहणा ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणली आणि सरकार येताच ती बंदही केली. तसेच महाराष्ट्रातही निवडणुकीच्या तोंडावर भाजपाप्रणित महायुती सरकारने (Maha Yuti government) लाडकी बहिण योजनेची केलेली घोषणा केवळ महिलांच्या मतांवर डोळा ठेवूनच केली आहे. महिलांना खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या योजना काँग्रेस सरकारनेच सुरु केल्या, असे सांगत कर्नाटक व तेलंगणात काँग्रेस सरकारची महालक्ष्मी योजना सुरु असून महाराष्ट्रात काँग्रेस मविआचे सरकार आल्यानंतर या योजना मोठ्या प्रमाणात राबवेल, असेही पटोले यांनी यावेळी जाहीर केले.

राज्यात पूरस्थिती (flood situation) भयानक असून शेतातील पिके व लोकांची घरेही वाहून गेली आहेत, त्यांच्या निवाऱ्याची सोय नाही, अन्नधान्याची सोय नाही. सरकारनेही अद्याप पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत. शेतकरी व पूरग्रस्त भागातील लोक सरकारी मदतीची अपेक्षा करत आहेत पण महायुती सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवावी. तेलंगणातील काँग्रेस सरकारप्रमाणे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, अशीही मागणी करतानाच, महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही, तर काँग्रेस मविआचे सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात