महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रा. राम शिंदे : विधानपरिषद सभापतीपदाच्या गौरवास्पद कार्यकाळाची वर्षपूर्ती

महाराष्ट्र विधानपरिषदेचे माननीय सभापती प्रा. राम शिंदे यांची 19 डिसेंबर 2024 रोजी सभागृहाने एकमताने सभापतीपदी निवड केली. त्यांच्या या जबाबदारीच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होत असून, या निमित्ताने त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, सभागृह संचालनातील शिस्तबद्धता आणि पीठासीन अधिकारी म्हणून दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे.

प्राध्यापक म्हणून लाभलेल्या अनुभवामुळे शिस्त, नियमांचे काटेकोर पालन आणि संतुलित निर्णयक्षमता हे सभापती प्रा. राम शिंदे यांचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे. सभागृह संचालन करताना हे गुण सर्व सन्माननीय सदस्यांना प्रकर्षाने जाणवतात. याच पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांचा उल्लेख आदराने “हेडमास्तर” असा केला होता.

सभापतीपदी एकमताने निवड झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय सदस्यांनी आपल्या भाषणांतून त्यांचे अभिनंदन करत अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या. त्याच वेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानपरिषद कामकाजासाठी Q-B-B-C ही चार सूत्रांची स्पष्ट दिशा मांडली.

Q-B-B-C : विधानपरिषद कामकाजाची चतु:सूत्री

Q – Question Hour (प्रश्नोत्तर तास):
प्रश्नोत्तर तासाचे महत्त्व लक्षात घेऊन जास्तीत जास्त प्रश्न पुकारले जावेत, एका तासात अधिकाधिक प्रश्नांच्या माध्यमातून लोकहिताशी संबंधित विषयांवर न्याय मिळावा, यावर भर देण्यात आला.

B – Bill (विधेयक):
विधेयक संमत करताना विधानपरिषदेत परिपूर्ण आणि विद्वत चर्चा व्हावी. हे सभागृह ज्येष्ठांचे असल्याने सखोल विचारमंथनातूनच कायदे निर्मिती व्हावी, हा ठाम दृष्टिकोन मांडण्यात आला.
“No Bill should be passed without discussion” हे तत्व अधोरेखित करण्यात आले.

B – Budgetary Process (अर्थसंकल्पीय प्रक्रिया):
अर्थसंकल्पीय चर्चांमध्ये सन्माननीय सदस्यांचा अधिक सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

C – Committee System (समिती व्यवस्था):
समिती पद्धतीला संसदीय लोकशाहीचा आत्मा मानले जाते. विधिमंडळ समित्या Mini Legislature म्हणून प्रभावीपणे काम कराव्यात, यावर विशेष भर देण्यात आला.

या Q-B-B-C च्या अंमलबजावणीमुळे अधिवेशनांमध्ये सभागृहातील कामकाज अधिक परिणामकारक, शिस्तबद्ध आणि सौहार्दपूर्ण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सभागृह सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांची नियमित बैठक घेण्याची पद्धत त्यांनी रूढ केली, ज्यामुळे समन्वय आणि सहमतीचे वातावरण निर्माण झाले.

डिजिटल लोकशाहीकडे वाटचाल

Paperless DemocracyOne Nation – One Platform, कायदेनिर्मिती प्रक्रियेत जनतेचा अधिकाधिक सहभाग आणि लोकनियुक्त प्रतिनिधींची उत्तरदायित्व वाढवणे, या लोकसभा अध्यक्ष माननीय ओम बिर्ला यांच्या संकल्पना महाराष्ट्रात प्रत्यक्षात आणण्याचे कार्य विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

पटणा येथे झालेल्या 85व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी
“भारतीय राज्यघटनेची 75 वर्षे : घटनात्मक मूल्यांच्या बळकटीसाठी संसद व राज्य विधानमंडळांचे योगदान”
या विषयावरील विचारमंथनात सहभाग घेतला. भारतीय राज्यघटनेमुळेच भारत आज जागतिक स्तरावर एक सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून उभा राहिला आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदीय प्रवास तत्कालीन बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलपासून सुरू झाला, हा महाराष्ट्रासाठी गौरवाचा विषय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शतक महोत्सव आणि संसदीय प्रशिक्षण

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त, सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन नागपूर हिवाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

फेब्रुवारी 2025 मध्ये सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र विधिमंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी नवी दिल्ली येथील संसद भवनात “PRIDE” संस्थेमार्फत दोन दिवसीय संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला. या अभ्यासवर्गाचा सदस्यांना मोठा लाभ झाला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मार्च 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिवादन प्रस्ताव घेण्याची सूचना सभापती प्रा. राम शिंदे यांनी मांडली. दोन्ही सभागृहांनी एकमताने हा प्रस्ताव मंजूर करून महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात एक गौरवपूर्ण क्षण नोंदविला.

त्याच अनुषंगाने 6 मे 2025 रोजी चोंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली. छोट्या गावात संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक होण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरली. चोंडी हे तीर्थक्षेत्र व पर्यटन केंद्र म्हणून लवकरच जागतिक स्तरावर नावारूपाला येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा.

— निलेश मदाने
जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
मा. सभापती यांचे जनसंपर्क अधिकारी
संचालक, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन, मुंबई

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात