X : @therajkaran
नवी दिल्ली
काँग्रेसकडून 14 जानेवारी ते 20 मार्चपर्यंत भारत न्याय यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रेला मणिपूर ते मुंबईपर्यंत असेल. काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपालने याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, भारत न्याय यात्रा अधिकतर अंतर बसने पार करणार आहे. काही ठिकाणी पदययात्रा केली जाईल. भारत न्याय यात्रा ही आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातसह 14 राज्यांतून 6200 किलोमीटरचा प्रवास करेल.
ही यात्रा निवडणुकीपूर्वी म्हणजे 20 मार्च रोजी संपेल. या यात्रेकडे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं दुसरं पर्व म्हणून पाहिलं जात आहे.
या यात्रेत राहुल गांधी तरुण, महिलांशी संवाद साधतील. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, न्याय यात्रा 6200 किलोमीटरचा प्रवास करेल. ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि शेवटी महाराष्ट्रातून जाईल. राहुल गांधी भारत न्याय यात्रेदरम्यान 14 राज्य आणि 85 जिल्ह्यातून प्रवास करतील.