नवी दिल्ली
2023 संपत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांनी त्यांच्या बागेतून ताजी फळे घेऊन घरी संत्र्याचा जॅम तयार केला. ही रेसिपी राहुल गांधी यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा यांची आहे.
राहुल गांधींनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर जॅम बनवण्याची प्रक्रिया अपलोड केली आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी आई सोनिया गांधींसोबत संत्र्याचा जॅम करताना दिसत आहेत. यावेळी दोघांमध्ये गप्पाही रंगल्या. सोनिया गांधी भारतात आल्या तेव्हा त्यांना भारतीय पदार्थांशी जुळवून घ्यायला वेळ लागला. यावेळी सोनिया म्हणाल्या, जेव्हा मी इथे आले, तेव्हा मला भारतीय चव, विशेषत: मिरचीशी जुळवून घेण्यास वेळ लागला. मात्र नंतर मला इथले पदार्थ प्रचंड आवडले. आजही परदेशातून आल्यानंतर आधी मी घरातला वरण-भात खाते.
व्हिडिओच्या सुरुवातीला दोघे जणं बागेत फळे तोडण्यासाठी टोपली घेऊन चालताना दिसतात. बागेतून फळं तोडल्यानंतर दोघेही स्वयंपाकघरात जाता आणि जॅमची तयारी करतात. राहुल गांधी यावेळी म्हणतात, भाजपच्या कुणाला जॅम हवा असेल तर तेही मिळवू शकतात, काय म्हणता, मम्मी?
‘ते आपल्यावरच फेकून देतील, सोनिया गांधींनी उत्तर दिले आणि दोघेही हसू लागतात. त्यानंतर राहुल गांधींनी दिलेली प्रतिक्रियाही रंजक आहे. ते म्हणतात, चांगलंय ना, मग आपण ते पुन्हा गोळा करू आणि पुन्हा हशा पिकतो.