मुंबई
तय्यार है हम; लेकीन हम भी नही कुछ कम; नरेंद्र मोदीजी मे है बहोत ज्यादा दम; विरोधी पक्ष मे बैठने के लिये तयार है तुम ; लेकीन सत्ता मे आयेगे नरेंद्र मोदीजी के साथ हम
अशी काव्यमय सुरुवात करून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा होती तशीच आता नव्याने सुरू होणारी भारत न्याय यात्रा ही अन्याय यात्रा आहे असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला लगावला आहे.
मुंबईत बांद्रा येथे पत्रकारांशी बोलताना ना. रामदास आठवले यांनी प्रीतिक्रिया दिली. काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्षांनी कितीही आटापिटा केला तरी त्यांना येत्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळणार नाही असे ना.रामदास आठवले म्हणाले, मैदानाला भारत जोडो नाव काँग्रेस देत आहे. मैदानाला नाव देऊन भारत जोडणार का असा सवाल करून गेली 70 वर्षे काँग्रेस ने त्यांच्या सत्ताकाळात काय केले? त्यांना 70 वर्षात भारत जोडता आला नाही का? राहुल गांधींवर भारत जोडो यात्रा काढण्याची का वेळ आली? मागील 70 वर्षात जर काँग्रेस ने सत्ता त्यांच्या काळात काम केले असते तर भारत जोडो यात्रा राहुल गांधींना काढण्याची गरज नसती पडली.पण राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने भारत अखंड जोडला गेला आहे. तो कोणीही तोडू शकत नाही. मात्र भारत तुटला आहे त्याला जोडला पाहिजे; संविधान धोक्यात आहे. ते बदलले जाईल असे खोटे प्रचार करून काँग्रेस दलित बहुजनांना मध्ये भीतीचे वातावरण बनवून अन्याय करीत आहे. कॉंग्रेस कडे सत्ता असताना त्यांनी कधीही सामाजिक न्यायाची भूमिका घेतली नाही.
गरीबांना दलितांना न्याय दिला नाही. आता भारत न्याय यात्रा काढून काँग्रेस पुन्हा अन्यायच करीत आहे. काँग्रेस ला भारत जोडायचा नाही तर तोडायचा आहे. दलित बहुजनांना काँग्रेस न्याय देऊ शकत नाही तर अन्यायच करणारी कॉंग्रेस आहे. ते आम्ही आता खपवून घेणार नाही असा इशारा ना.रामदास आठवले यांनी दिला आहे.