महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई मराठी पत्रकार संघात रंगला कवितेचा जागर

मुंबई : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई मराठी पत्रकार संघ आणि जागतिक मराठी अकादमीच्या संयुक्त विद्यमाने मराठी कवितेचा जागर रंगला. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, महेश केळूसकर यांच्यासह अनेक युवा कवी आणि पत्रकारांनी या सोहळ्यात आपल्या कविता सादर केल्या.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता तिचा दर्जा टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जागतिक मराठी अकादमी आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांचे सहकार्य अधिक दृढ होईल, तसेच युरोपमध्ये मराठी अधिवेशन भरवता येईल का, याचा प्रयत्न करावा, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या कवी संमेलनात रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, महेश केळूसकर, शशिकांत तिरोडकर, संकेत म्हात्रे, प्रथमेश पाठक, जितेंद्र लाड, मंगेश विश्वासराव, भगवान निळे, सदानंद खोपकर, अजय वैद्य आणि प्रसाद मोकाशी यांनी आपल्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे तसेच कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांच्यावर वर्तमानपत्रांत प्रकाशित लेख आणि मुलाखतींच्या कात्रणांचे प्रदर्शन भरवण्यात आले. या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन रामदास फुटाणे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र हुंजे यांनी केले, तर आभार आत्माराम नाटेकर यांनी मानले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात