X : @therajkaran
मुंबई- ‘राज्यात गेल्या दोन वर्षांत घोषित केल्यानुसार मेगाभरती (mega recruitment) सुरू असून ७७ हजार ३०५ लोकांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. यापैकी ५८ हजार उमेदवार प्रत्यक्ष सेवेत रूजू झाले आहेत. उर्वरित ३१ हजार लोकांना लवकरच नियुक्तीपत्रे देण्यात येतील. सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात १ लाखांहून अधिक भरती केली असून हा विक्रम आहे’, अशी माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्तावाला उत्तर देतांना दिली.
मागणीनुसार राज्य सरकारच्या वतीने गट ‘क’च्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) राबवली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सदस्य राजेश टोपे (Rajesh Tope) यावेळी म्हणाले, या भरतीसाठी असलेल्या आवेदनाचे शुल्क १ हजार रुपये असून ते कमी करावे. यावर देेवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यशासनानेे भरती केलेल्या ७७ हजार ३०५ पदांमध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. भरतीसाठी आवेदनाचे शुल्क कमी करण्याविषयी सरकार नक्कीच विचार करेल. टी.सी.एस्. आाणि आय.बी.पी.एस्. या दोन्ही संस्थांनी परीक्षा घेतल्या आहेत. आम्हाला कोणतीही गोष्ट लपवण्याचे कारण नाही. सरकार पूर्ण पारदर्शीपणे काम करत आहे असा दावा त्यांनी केला.