X : @therajkaran
नागपूर
मुंबईतील आग्रीपाडा येथील भूभाग औद्योगिक प्रशिक्षण संस्थे (आयटीआय) कडून काढून उर्दू लर्निग सेंटर उर्दू भवन (Urdu Bhavan) उभारण्यासंदर्भातील लक्षवेधी धार्मिक आणि भाषिक वाद-प्रतिवादावरून प्रचंड वादग्रस्त झाली.
रईस शेख, नितेश राणे यांचे आरोप-प्रत्यारोप, सत्तारूढ पक्षाच्या सदस्य स्थानिक आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांनी आक्रमकपणे या भूभागावर उर्दू लर्निग सेंटर होणे हा प्रस्ताव महापालिकेत (BMC) एकमताने मंजूर झाला होता, याची आठवण दिली. उर्दू ही या देशातील भाषा आहे, तिचा कोणा धर्माशी संबंध जोडणे योग्य नाही, असे त्यांनी ठासून सांगितले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी हे सभागृह विकासासाठी आहे, धर्मा-धर्मात तेढ का निर्माण करता, महाराष्ट्राला आग लावायची आहे का? असा सवाल केला. मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी आयटीआयकडून ही जागा काढून उर्दू भवन उभारण्याचा निर्णय, तत्कालीन मुख्यमंत्री यांनी उर्दू प्रेमामुळे परस्पर घेतला, असा आरोप लक्षवेधी मांडताना केला.
उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी आयटीआयने भूईभाडे तसेच जीएसटी भरणा मनपाला केला नाही असे स्पष्ट केले. मनपाने २५ ऑक्टो. २१ रोजी ठराव करून पूर्वीचे आदेश रद्द करून भूभाग ताब्यात घेतला. तेथे उर्दू भाषा, लर्निग सेंटर बनविण्यासाठी आराखडे बनवले, आणि २३ऑगस्ट २२ रोजी मंजूरी दिली. अकरा कोटी ३४ लाखांचे कंत्राट दिले.आतापर्यंत या उर्दू भाषा लर्निग सेंटरचे ४३ टक्के काम झाले आहे. सदर उर्दू भाषा लर्निग सेंटरचा ठराव रद्द व्हावा यासाठी याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मुख्य सचिव सूचनेनुसार सदर काम ५-९-२३ पासून थांबले आहे, असे उदय सामंत यांनी उत्तर देताना सांगितले.